राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल; स्मृती इराणी म्हणाल्या, "कृतघ्न..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 08:32 AM2021-02-24T08:32:17+5:302021-02-24T08:35:52+5:30
Rahul Gandhi : राहुल गांधी हे कृतघ्न असल्याचं म्हणत स्मृती इराणी यांनी साधला जोरदार निशाणा
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. केरळमध्ये राहुल गांधी यांच्याद्वारे नाव न घेता अमेठीवर केलेल्या एका वक्तव्यावरून स्मृती इराणी यांनी निशाणा साधला.
"१५ वर्षांपर्यंत मी उत्तर भारतात खासदार होतो. मला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. माझ्यासाठी केरळमध्ये येणं नवं होतं. कारण मला वाटलं इथल्या लोकांना मुद्द्यांमध्ये आवड असते आणि ते मुद्द्यांच्या विस्तारात जाणारे आहेत," असं राहुल गांधी म्हणाले होते.
त्यांच्या या वक्तव्यावर स्मृती इराणी यांनी जोरदार निशाणा साधला. स्मृती इराणी यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ते कृतघ्न असल्याचं म्हटलं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला. "सनातन आस्थेच्या केरळपासून प्रभू श्रीराम यांचं जन्मस्थळ असलेल्या उत्तर प्रदेशपर्यंत सर्व लोकांनी तुम्हाला ओळखलं आहे. तोडण्याचं राजकारण हे तुमचे संस्कार आहे. आम्ही उत्तर किंवा दक्षिण नाही संपूर्ण देशाला मातेसमान मानतो," असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला.
एहसान फरामोश!
— Smriti Z Irani (@smritiirani) February 23, 2021
इनके बारे में तो दुनिया कहती है -
थोथा चना बाजे घना। https://t.co/3jsNYn6IPq
श्रीमान राहुल जी,
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 23, 2021
सनातन आस्था की तपस्थली केरल से लेकर प्रभु श्री राम की जन्मस्थली उत्तर प्रदेश तक सभी लोग आपको समझ चुके हैं।
विभाजनकारी राजनीति आपका राजनीतिक संस्कार है।
हम उत्तर या दक्षिण में नहीं, पूरे भारत को माता के स्वरूप में देखते हैं।
तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीदेखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली. "राहुल गांधी यांनी पहिले उत्तर भारताला काँग्रेसमुक्त केलं. आता दक्षिणेकडे गेले आहेत. आमच्यासाठी आणि जनतेसाठी देश एक आहे. काँग्रेस भारताला उत्तर आणि दक्षिण अशा भागात विभागू पाहत आहे. जनता या प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नाही," असंही ते म्हणाले.