West Bengal Assembly Election 2021:  राहुल गांधी जिथे जिथे सभेसाठी गेले, तिथे तिथे काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झाले 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 04:23 PM2021-05-03T16:23:12+5:302021-05-03T16:32:41+5:30

West Bengal Assembly Election 2021: काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीचे पश्चिम बंगालमधील अस्तित्व जवळपास संपुष्टात आले असून, काँग्रेस आणि डाव्यांना एकही जागा मिळाली नाही.

West Bengal Assembly Election 2021: Congress deposits confiscated wherever Rahul Gandhi held rallies | West Bengal Assembly Election 2021:  राहुल गांधी जिथे जिथे सभेसाठी गेले, तिथे तिथे काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झाले 

West Bengal Assembly Election 2021:  राहुल गांधी जिथे जिथे सभेसाठी गेले, तिथे तिथे काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झाले 

Next
ठळक मुद्देबंगालमध्ये काँग्रेस डाव्या आघाडीच्या तब्बल ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त राहुल गांधी यांनी माटीगारा-नक्षलवाडी आणि गोलपोखर येथे १४ एप्रिल रोजी प्रचारसभा घेतल्या होत्यामात्र येथील काँग्रेसचे उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकले नाहीत

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. (West Bengal Assembly Election 2021) तर दोनशे जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला ७७ जागांवरच समाधान लागले. मात्र या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीचे पश्चिम बंगालमधील अस्तित्व जवळपास संपुष्टात आले असून, काँग्रेस (Congress) आणि डाव्यांना एकही जागा मिळाली नाही. दरम्यान, बंगालमध्ये काँग्रेस डाव्या आघाडीच्या तब्बल ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या दोन ठिकाणी राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या तिथेही काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होऊन दारुण पराभव झाला आहे. (Congress deposits confiscated wherever Rahul Gandhi held rallies)

या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने प्रसारित केले आहे. त्यातील आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, डावे पक्ष आणि आयएसएफ आघाडीने २९२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ ४२ जागांवर अनामत रक्कम वाचवता आली. या आघाडीतील आयएसएफ या घटक पक्षाला एक जागा मिळाली. तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे बंगालच्या विधानसभेत पहिल्यांदाच काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे सदस्य दिसणार नाही. 
   
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माटीगारा-नक्षलवाडी आणि गोलपोखर येथे १४ एप्रिल रोजी प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र येथील काँग्रेसचे उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. माटीगारा-नक्षलवाडी मतदारसंघावर काँग्रेसचा दशकभरापासून कब्जा होता. मात्र येथील आमदार शंकर मालाकार यांना यावेळी केवळ ९ टक्के मते मिळाली. गोलपोखर येथेही काँग्रेसला केवळ १२ टक्के मते मिळाली. 

काँग्रेस, डावे पक्ष आणि आयएसएफ आघाडीमध्ये डाव्या पक्षांनी १७० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी २१ जागांवर त्यांना डिपॉझिट वाचवता आले. तर काँग्रेसला ९० जागांपैकी ११ जागांवर डिपॉझिट वाचवण्यात यश मिळवले. तर आयएसएफने ३० जागांपैकी १० जागांवर डिपॉझिट वाचवण्यात यश मिळवले. तसेच एका जागेवर विजयही मिळवला.  

डाव्या पक्षांना केवळ चार जागांवर तर काँग्रेसला केवळ २ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहता आले. दरम्यान, या पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत झालेल्या मोठ्या प्रमाणावरील घटीचा थेट फायदा तृणमूल काँग्रेसला झाला. बंगालमध्ये काँग्रेसला केवळ २.९४ तर डाव्या पक्षांना केवळ ५ टक्के मते मिळाली. 
 

Web Title: West Bengal Assembly Election 2021: Congress deposits confiscated wherever Rahul Gandhi held rallies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.