Photos : राहुल गांधींनी मासे पकडले अन् समुद्रात डुबकीही घेतली By महेश गलांडे | Published: February 24, 2021 09:24 PM 2021-02-24T21:24:28+5:30 2021-02-24T21:35:19+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर असून तेथील सर्वसामान्य नागरिकांशी एकरुप होण्याचा, त्यांच्यात मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या, सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. कॉंग्रेसचे प्रमुख नेते आणि खासदार राहुल गांधी हे सध्या केरळ दौर्यावर आहेत. यावर्षी केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी राहुल गांधी वेगवेगळ्या क्षेत्रांचा दौरा करत आहेत.
केरळमधील जनतेला बुधवारी राहुल गांधींचं एक वेगळं रुप दिसून आलं, केरळच्या कोल्लममध्ये राहुल गांधी मासेमारांसह समुद्रात गेले अन त्यांच्यासोबत मासेमारी करताना दिसले.
राहुल गांधी यांनी येथील मासेमारांशीही चर्चा केली, त्यांच्याबरोबर नावेत बसून समुद्रात मासेमारी करण्याचा आनंदही लुटला. राहुल गांधींचा साधेपणा पाहून येथील मच्छीमारांनाही आनंद झाला.
कोल्लम येथे मच्छीमारांशी बोलतांना राहुल गांधी म्हणाले, ज्या पद्धतीने शेतकरी शेतात काम करतात त्याच पद्धतीने मासेमार समुद्रात काम करतात .केंद्र सरकारमध्ये शेतकर्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय आहे, परंतु मासेमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय नाही.
राहुल गांधी केरळ मध्ये मच्छीमारांसोबत पाण्यात उतरले होते. तसेच त्यांच्यासोबत मासेमारी केली अन् सुमद्रात डुबली लावून पोहण्याचा आनंदही घेतला.
राहुल गांधींनी समुद्रात पोहोतेवेळी त्यांना सुरक्षेचं कवच लावण्यात आलं होतं. त्यांच्यातील सर्वसामान्य माणूस पाहून केरळवासीय मच्छीमार भारावल्याचं दिसून आलं.
राहुल गांधींनी येथील नागरिकांशी त्यांच्या भाषेतील काही शब्दांचा अर्थ समजावून घेतला, तसेच ते शब्दही उच्चारले होते
मच्छिमार बांधवांसोबत मासे पकडताना राहुल गांधी या फोटोत दिसत आहेत, राहुल गांधींचे हे रुप सर्वांना आवडले
निळा टी शर्ट, तोंडाला मास्क, कॉटन पँट आणि पायात स्लीपर घालून नावेतून समुद्रात उडी घेताना राहुल गांधींचा टिपलेला हा क्षण
महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या ट्विटरवरुन राहुल गांधींचे हे फोटो शेअर केले आहेत.